पोलीस निरीक्षक धनवडे यांच्या उत्कृष्ट कार्याचा ८० वर्षीय आजींकडून गौरव

यावल, प्रतिनिधी । कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र परिश्रम घेऊन यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी तालुक्यात शिस्तबद्ध मार्गाने कायदा-सुव्यवस्था राखण्यात लक्ष वेधणारी कामगिरी केल्याने काल शुक्रवारी एका आजींनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावल शहरातील एका ८० वर्षीय आलिशानबी शेख या शहरात त्यांचे कोणतेही नातेवाईक नसलेल्या व एकट्या राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाच्या आजीने लोकांकडून भिक्षा मागून साठविलेल्या पैसे खर्च करून पोलिस अरुण धनवडे यांच्या कार्याचा शाल व पुष्पहार देऊन गौरव केला. याप्रसंगी अल्पसंख्यांक समाजाच्या एका वयोवृद्ध महिलेने आपण कोरोना लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कार्याचा गौरव सत्कार केल्याबद्दल अत्यंत भावनिक झालेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आज मला साक्षात प्रभू श्रीरामाची शबरी भेटली असे उदगार त्यांनी काढले व त्यांनी त्या वयोवृद्ध आजीचे आपल्या भावी आयुष्यासाठी व कारकिर्दी करिता आशीर्वाद घेतले

Protected Content