जळगावात पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

6f0422c7 9ffb 4060 a130 5ddc0cf46119

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व ‘नजर फाउंडेशन’ जळगावतर्फे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते यांच्या पाल्यांसह गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण आज (दि.९ जुलै) सकाळी १०.०० वाजता कांताई सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तब्बल ६८५ विद्यार्थ्यांना साहित्य वितरीत करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, दै.देशदूतचे महाव्यवस्थापक विलास जैन, जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थाचे मानद सचिव निलेश भोईटे, दै.साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे, ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’चे संपादक शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीणसिंग पाटील, बेंडाळे महाविद्यालयाच्या मास मिडीया विभागाचे प्रमुख डॉ. जयंत लेकुरवाळे, सामाजिक कार्यकर्ते अजय बढे, एल.एच.पाटील, इंग्लिश स्कूलचे संचालक कुणाल पाटील, प्रॉकसॉन कंपनीचे श्री.काजी, सागर चौधरी, मुकेश सोनवणे, जैन इरिगेशनचे मिडीया विभाग प्रमुख अनिल जोशी, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, सामाजिक कार्यकर्ते हरीचंद्र सोनवणे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी श्री. गाडीलकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा, तसेच साहित्याचा योग्य वापर करावा. ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांकडे स्मार्ट फोन देऊ नये, कारण मोबाईलमुळे संस्कृती तसेच विद्यार्थी अभ्यास न करता मोबाईलमधील वेगवेगळे गेम खेळत असल्याने मोबाईल हा एकप्रकारे बॉम्ब ठरला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक यांनी सांगितले की, सध्या सामाजिक बांधिलकी कमी होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे काळाची गरज आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात सामाजिक हित जोपासत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. यावेळी ६८५ विद्यार्थ्यांना दप्तर, वॉटरबॅग, कंपासपेटी, डबा, वह्या असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच संघाच्या पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले तर आभार शरद कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा संघटक भगवान मराठे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे, शैलेश पाटील, संतोष ढिवरे, अनुप पानपाटील, चेतन निंबोळकर, हेमंत विसपुते, स्वप्निल सोनवणे, परशुराम बोंडे, सचिन पाटील, सुनील भोळे, मुकेश जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपक सपकाळे, महानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील, सुकलाल सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content