नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परषिदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या सहकार्याने वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांना साहित्य वाटप करण्यात आले.
वन्यजीव संरक्षण जळगाव संस्थेचे सदस्य सर्पमित्र तुषार रंधे यांच्यासह इतर सर्व सभासद हे सर्पमित्र आहे. सर्प हे विविध जातीचे असतात व त्यांना पकडण्यात अडचणी निर्माण होतात व प्राणी पक्षांना सुद्धा कोणत्याच गोष्टीचा आधार न घेता त्यांना सतत धडपड करावी लागते. या अनुषंगाने सभासदांच्या बचावासाठी संरक्षण कीटची आवश्यकता असते. त्यामुळे संरक्षण कीट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सर्पमित्र तुषार रंधे यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी क्षणाचा विचार न करता लागणाऱ्या साहित्याची विचारपूस करून दोन हुक स्टिक, दोन बॅग, एक टॉर्च आदि सामानांचे कीट उपलब्ध करून दिले.
सर्पमित्र जीवाची परवा न करता प्राणी, पक्षी, विषारी सर्प यांना वाचवण्यासाठी कार्य निस्वार्थीपणे करत असतात. नशिराबादच्या परिसरातील काही आजूबाजूच्या गावांमधील सुद्धा बरसे मोबाईल फोनच्या द्वारे सर्प निघाल्याचे कॉल येत असतात. त्वरित माहिती मिळताच सर्पमित्र तुषार रंधे, अमित सोनवणे, लोकेश नेरकर, सागर भोई, विनायक सोनटक्के ही सर्व टीम घटनास्थळी जावून साप पकडतात. आणि त्याच ठिकाणी सर्प जनजागृतीचे कार्य देखील करत असतात.