खंडेरावनगरातील दंगलप्रकरणी अटकेतील संशयीतांना दोन दिवस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगर-आझाद नगर परिसरात मुलीच्या छेडखानीवरुन उसळलेल्या दंगलीत दोन्ही गटाच्या ४० ते ४५ संशयीतांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या अटकसत्रात १६ संशयीतांना अटक झाली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे. आज सोमवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी आणखी ८ संशयीतांना अटक करण्यात आली. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना २ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

खंडेराव नगरातील आझाद नगरात मुलीच्या छेड काढल्याच्या कारणावरून २ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता दोन गटात दगडफेक व हाणामारी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सहाय्यक फौजदार संजय सपकाळे यांच्या तक्रारीवरुन दाखल दंगलीच्या गुन्ह्यात पहिल्याच दिवशी पोलिस पथकाने जयेश सिताराम भोई(वय-१८), शोएब खान फिरोज खान(वय-३१), इम्रान बशीर पिंजारी(वय-३१), नवाज शेख वाहेद (वय-२३),महेश काशिनाथ भोई(वय-२४),स्वप्नील संजय नाथ (वय-२५), भुषण दगडू महाजन (वय-२७), रमजान फारुख पिंजारी(वय-२१), समीर नजीर पिंजारी(वय-२०),दानिश बशीर पिंजारी (वय-२०), मुक्तार जाकिर पिंजारी, (वय-२२), समीर शेख सलीम (वय-२१), शेख रईस शेख ईस्माईल (वय-२०), ईरफान चॉंद पिंजारी(वय-३३), केदार यादवसिंग राठोड(वय-२७),लहू ब्रिजलाल धनगर(वय-२८) अशांना रविवारी अटक करण्यात येवुन त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

तसेच फरदिन मोहम्मद पिंजारी (वय-१८), फिरेाज बाशींद पिंजारी (वय-२१) अशांना रविवारी मध्यरात्री  तर, इमरान ऊर्फ गुड्डू चॉंद पिंजारी (वय-२३), तस्लीम ऊर्फ भुर्या शकूर पिंजारी (वय-३५), वसीम जुम्मा पिंजारी(वय-२२), सद्दाम जुम्मा पिंजारी(वय-२५), शरिफ सिराज पिंजारी (वय-२५), हकिम अली हुकूमत अली(वय-२२) अशांना आज सोमवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी अटक करण्यात आली. अटकेतील संशयीतांना सोमवार, ४ ऑक्टोंबर न्या.  हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयीतांना दोन दिवस पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले. सरकारपक्षातर्फे ऍड. निखील कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले.

फरार संशयितांचा शोध सुरु

अश्पाक खान, अज्जु चावल, अख्तर फकीर मोहम्मद पिंजारी, अख्तर दिलेमान पिंजारी, समीर अमीर पटवे, संजय धनगर, सागर कपिल भोई, राकेश अशोक भोई, विकी अशोक भोई, विक्की मिठाराम भोई, नाना भोई, यशवंत भोई, समाधान भोई, मुश्ताक ईदु पिंजारी, इम्रान युनूस पिंजारी, गंभीर सरदार पिंजारी, अनिस युसूनस पिंजारी, शाहिद रशीद पिंजारी, शाहरुख शेख पिंजारी, आवेश पिंजारी, सांदिक शेख मुनाफ व इतर संशयित फरार असून त्यांचा पोलिसांचे विवीध पथके शोध घेत आहेत.

Protected Content