जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु

जळगाव, प्रतिनिधी । राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील तरतुदी शिथिल करण्यात आला आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात व्यायामशाळा सुरु करण्यास मंजूरी देण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी आज काढले आहे.

या परिपत्रकाच्या अधिन राहून 25 ऑक्टोबर, 2020 पासून जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले क्षेत्र वगळून व भविष्यात वेळोवेळी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणारे क्षेत्र क्षितील करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईस समोरे लावेल लागेल, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्देश दिले आहे.

Protected Content