पारोळा प्रतिनिधी । प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प, यावल जि.जळगांव आयोजित पिंप्री (मोंढाळे) येथील आदीवासी बांधवांना खावटी किट वितरण सोहळा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी आदीवासी समाजासोबत समाजातिल इतर घटकांनाही शासनाचा योजनेचा कसा लाभ होईल यासाठी काम करा. तसेच जे आदीवासी बांधव खावटी अनुदानापासुन वंचित असतील त्याचे नव्याने सर्वेक्षण करून त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळवुन द्या. समाजातील एकही व्यक्ति योजनांपासुन वंचित राहु नये असे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करा अश्या सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच पिंप्री येथील ग्रामस्थांनी आबासाहेबांकडे रस्त्याची मागणी केली. यामागणीची त्वरीत दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याची मागणी लवकरच दुर करणेबाबत ठोस आश्वासन दिले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत पाटील, पिंप्री येथील दगाजी पाटील, राजेंद्र पाटील, भैय्यादादा पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो चेअरमन, सदस्य, यावल कार्यालय प्रतिनीधी, आदीवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.