माधवानंद दुध संकलन ग्रुपतर्फे भेट वस्तुंचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील माधवानंद दुध संकलन ग्रुपच्या सभासदांना दिवाळी निमित्त भेट वस्तु वाटपाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष- मनोहर महाजन, मनोहर माळी(उपाध्यक्ष),रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माधवानंद दुध संकलन ग्रुपचे चेअरमन नितिन गुरव, संचालक मोतीलाल महाजन, युवराज महाजन, शामराव महाजन, शालिक पहेवान व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन- कुवर गुरव यांनी तर आभार नितिन गुरव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकलन ग्रुपचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content