क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा ‘हा’ आहे मास्टरमाईंड : मोहित भारतीय

मुंबई,प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित भारतीय यांनी ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या संदर्भात फोटो, ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत दाखवून या सर्व प्रकरणात सुनील पाटील नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे.

 

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता यात नवीन वळण मिळाले आहे. मोहित भारतीय म्हणाले, गेल्या महिन्यापासून एक प्रकरण गाजत आहे. ते म्हणजे आर्यन खान प्रकरण… दोन तारखेला अटक झाली आणि ३ तारखेला त्याला रिमांड मिळाला. त्यानंतर ६ तारखेला पत्रकार परिषद घेऊन एका मंत्र्याने भाजप, एनसीबीवर आरोप केले. या सर्वांच्या मागची कहाणी मी पुराव्यांसह सादर करत आहे. या सर्व गोष्टींचा मास्टरमाईंड सुनिल पाटील आहे. हा सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे असा दावाही मोहित भारतीय यांनी केला आहे.

 

 

२०  वर्षांपासून सुनील पाटील एनसीपीच्या संपर्कात

सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे आणि तो गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे. सुनील पाटील हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याचा जिगरी मित्र आहे. सुनील पाटील हा बदल्यांचं रॅकेट चालवत होता. सुनील पाटील याचे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांसोबत जवळचे संबंध असल्याचाही गंभीर आरोप मोहित भारतीय यांनी केला आहे.

किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस
मोहित भारतीय यांनी पुढे म्हटलं, किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस आहे. सुनील पाटील यांनी किरण गोसावींचा नंबर सॅम डिसूझाला दिला होता. इथे हा प्रश्न निर्माण होत आहे की एनसीपीने सुनील पाटीलला पुढे करत हे का केले, कोण मंत्री आहे जे हे सगळे करत आहेत. खूप सिनियर लिडर आहे, मी त्यांच्यावर आरोप लावत नाही पण त्यांना हे सांगावे लागले की, त्यांच्या लोकांचे, मंत्र्यांचे पक्षाचे या व्यक्तींशी काय संबंध आहे.

Protected Content