बोढरे येथे मोफत बाजरीचे बियाणे वितरण

चाळीसगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील बोढरे येथे कृषी विभागामार्फत शंभर लाभार्थ्यांना मोफत बाजरीचे बियाणे कृषी सहायक तुफान खोत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

चाळीसगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर कृषी विभागामार्फत विविध अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाकडून पद्मालय कंपनीच्या मोफत बाजरीचे बियाणे विविध भागात वितरीत करण्यात येत आहेत. नुकतेच बोढरे ग्रामपंचायतीला कृषी विभागामार्फत शंभर बियाणांची बॅग उपलब्ध झाल्याने कृषी सहायक तुफान खोत यांच्या हस्ते शंभर जणांना मोफत बाजरीचे बियाणे वितरीत करण्यात आले. त्याचबरोबर असंख्य योजना ह्या कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. ह्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून यांचा लाभ घेता यावा यासाठी कृषी सहायक तुफान खोत अतोनात प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची चर्चा नेहमीच तालुक्यात होत  असते. या बियाणे वितरीत प्रसंगी कृषी सहायक तुफान खोत, सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र परदेशी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Protected Content