चाळीसगाव येथील माजी विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी ।  तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे पीडितांना सणाच्या दिवशी गोड जेवण मिळावे, यासाठी बाणगाव, खेरडे व इतर ठिकाणी माजी विद्यार्थ्यांकडून अन्नधान्य वाटप करण्यात आले.

चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या दहावी वर्गाचे माजी विद्यार्थी हे एकत्रित येऊन सामाजिक भावनेतून पूरग्रस्तांना अन्नधान्याचे वाटप तालुक्यातील बाणगाव, खेरडे आदी ठिकाणी करण्यात आले. ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे अनेकांचे जनावरे व घरेच वाहून गेल्याने त्यांच्यावर डोंगर कोसळले आहेत. दरम्यान बैलपोळ्याचा सण साजरा करण्यासाठी पूरग्रस्तांना गोडगोड जेवण घेता यावा या पाश्र्वभूमीवर अन्नधान्याचे वाटप १९८२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. यावेळी ७५ घरांना धान्य त्यांच्या घरी जाऊन वितरीत करण्यात आले. 

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागचे अभियंता के. बी. चव्हाण ,पाटबंधारे विभागचे अभियंता रवींद्र वाघ, खोपोली येथील आदीवासी आश्रम शाळेचे अधिकारी पुरुषोत्तम वाणी, अभियंता काशिराम जाधव ,पत्रकार आर. डी. चौधरी , भुसावळ चे प्रा.के. के. अहिरे, नंदा राम सूर्यवंशी, राजेंद्र देवकर, सहकार खात्याचे संजय जगन्नाथ पाटे ,निंबा वाघ ,सादिक खाटीक आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content