यावल येथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

यावल प्रतिनिधी | राज्यात मागील दोन महीन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी हे आपल्या एसटी महामंडळाचे शासनात विलीनिकरण करावे व अन्य विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या आंदोलनामुळे एसटी सेवेतील कर्मचारी अनेक समस्या व आर्थिक संकटात ओढवले गेले असून भारतीय जनता पक्ष हे राज्यातील एसटीचे संपकरी कर्मचारी यांच्या सोबत खंबीरपणे उभी असल्याचे यावेळी भाजपाच्या मान्यवरांनी सांगीतले. यावेळी संपकरी कर्मचारी यांना सामाजिक बांधीलकीतून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये याकरीता ‘मदतीचा हात’ म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते यावल एसटी आगारातील सुमारे २७५ कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करण्यात आले,

सोमवार, दि.२४ जानेवारी रोजी दुपारी यावल येथील एसटी आगाराच्या परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रविन्द्र पाटील, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परिषदच्या सदस्या सविता भालेराव, उपसभापती योगेश भंगाळे, यावल नगर परिषदचे तत्कालीन नगरसेवक युवा सामाजीक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे, अखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल पाटिल, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, कृउबाचे संचालक तथा कृषीभूषण नारायण चौधरी, कृउबाचे माजी उपसभापती राकेश फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, कृउबाचे माजी सभापती हिरालाल चौधरी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटु राणे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राहुल बारी यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले .

Protected Content