रद्दीदानातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

चाळीसगांव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जेसीआय चाळीसगाव सिटी व वसुंधरा फाउंडेशन सरसावली आहे. ‘रद्दीदान महोत्सव’ अंतर्गत रद्दी पेपर संकलन करून तसेच दात्यांच्या मदतीने नगरपालिका शाळेतील २१० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. दरवर्षाप्रमाणे रद्दी पेपर संकलन करून तसेच दात्यांच्या मदतीने नगरपालिका शाळा क्र.१ ,४,७, १६ या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जेसीआय चाळीसगाव सिटी व दात्यांच्या मदतीने रद्दी दान महोत्सव अंतर्गत नगरपालिका शाळा क्र.१ ,४,७, १६ या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २१० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे शिक्षणाची गंगोत्री तळागाळात पोचविण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते, असा सूर्य या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या भाषणातून निघाला.

व्यासपीठावर झोन १३ चे माजी झोन अध्यक्ष जेसी निलेश गुप्ता, माजी अध्यक्ष जेसी डी. के. चौधरी, वसुंधरा फाउंडेशनचे संस्थापक सचिन पवार, वसुंधरा फाउंडेशन कोषाध्यक्ष देवेंन पाटील, खुशाल पाटील,  हरेश जैन, जेसीआयचे अध्यक्ष धर्मराज खैरनार, मुख्याध्यापक ज्ञानेश साळुंखे, प्रकल्प प्रमुख नरेंद्र शिरुडे, अन्वर अली मनियार उपस्थित होते.

जेसीआयचे अध्यक्ष धर्मराज खैरनार म्हणाले की,  “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी रद्दी दान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात जमा झालेली रद्दी विकून त्यातून नगरपालिका शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य उपलब्ध करून  देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा माजी अध्यक्ष निलेश गुप्ता यांनी मनोगतात म्हटले की,  “मी या शाळेचा विद्यार्थी असून आज मी उच्च पदावर पोहोचलो आहे. नगरपालिका शाळेंनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत आणि ते चांगल्या पदावर आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नगरपालिका शाळेच्या असलेल्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल.” असे त्यांनी  सांगितले.

यावेळी वसुंधरा फाउंडेशनचे संस्थापक सचिन पवार यांनी न.पा. शाळा या नावाचे पालकांमध्ये आकर्षण कमी झालेले आहे त्यासाठी न.पा. शाळेना महापुरुषांची नाव दिली गेली पाहिजे, असे आपल्या मनोगतात सांगितले.

साहिल दाभाडे, मनोज पाटील, जगन्नाथ चिंचोले, महेंद्र कुमावत, चंद्रकांत ठाकरे, सागर ठाकरे, दिनेश पचलुरे, शितल गवळे, नितीन राठोड, अविनाश साखरे, राखी ठोके, अविनाश चव्हाण, उमेश राजपूत, सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिल पेटे व आभार निवृत्ती उंबरकर यांनी मानले.

वसुंधरा फाउंडेशनच्या या उपक्रमाला अनेक वर्षाची किनार लागलेली आहे. गेल्या दहा वर्षापासून संस्था हा उपक्रम राबवत आहेत. आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात देखील जाऊन तेथील गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले आहे. याशिवाय नगरपालिकेत शाळांमध्ये देखील यापूर्वीदेखील वह्या वाटप करण्यात आलेले आहे. या उपक्रमाला दाते देखील भरभरून मदत करत असतात ते आपल्या घरातील रद्दी फाउंडेशनकडे जमा करतात. हीच रद्दी विकून त्यातून मिळालेल्या पैशांमधून वह्या खरेदी करण्यात येतात आणि या वह्या गरजवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतात.

Protected Content