बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २९ जून रोजी नाशिक येथील पडसाद अपंग उपचार व पुनर्वस केंद्राचा वर्धापन दिन स्तुत्य उपक्रमाने साजरा करण्यात आला. गेली ३५ वर्षपासून मूकबधिर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेमार्फत मुलांना भाषणपर पुस्तकांचे वाटप मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रात सध्या १२३ विद्यार्थी असून त्यापैकी १०० मुलांना भाषणपर पुस्तक वितरित करण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तूंचे देखील वाटप मंगेशजी चिवटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता प्रमुख मंगेश चिवटे यांनी केंद्राला खारीचा वाटा म्हणून ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. यावेळी भाषणादरम्यान मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशकडून होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या २ वर्षात २७५ कोटींचा निधी गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी वितरित करण्यात आला असल्याचे देखील चिवटे यांनी भाषणात सांगितले.या निधीत १ हजार लहान मुलांना कॉंलिअर इम्प्लांट साठी मदत केल्याचे देखील सांगण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात केंद्राला आणखीन मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रथमेशजी पाटील, केंद्राचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.