अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये अमळनेर येथील दिव्यांग खेळाडू दिनेश बागडे याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावून अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नवी दिल्ली येथे २० ते २७ मार्च दरम्यान होत आलेल्या स्पर्धेत बुधवारी २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता या स्पर्धेत दिनेशने १०७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले.
नवी दिल्ली येथे २० ते २७ मार्चदरम्यान झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम स्पर्धेत एकूण १३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वेटलिफ्टिंगच्या १०७ किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत सात स्पर्धक आमनेसामने होते. मात्र, दिनेशने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने सर्वांना मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत देशभरातील एकूण १३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. दिनेशने अंतिम फेरीत सात स्पर्धकांवर मात करत सुवर्णपदक मिळवले. गेल्या स्पर्धेत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळेस त्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले. दिनेशच्या या यशाबद्दल अमळनेर तालुका क्रीडा संघटना, अमळनेर शहर आणि तालुका पत्रकार संघ आणि कंजर भाट समाजाने त्याचे अभिनंदन केले आहे.