धुळे प्रतिनिधी । रेमडेसिवीरसह ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे Dr. Subhash Bhamre यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेत निवेदन दिले.
राज्यासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वेगात वाढते आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. या इंजेक्शनसह ऑक्सिजनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करावी. रेमडेसिवीरसह ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे Dr. Subhash Bhamre यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली.
खासदार डॉ.भामरे यांनी मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना निवेदन दिले. त्या म्हटले आहे की, राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन वेळेत मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार करताना कसरत करावी लागते आहे. तसेच काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा जाणवतो आहे. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची भटकंती होते आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी डॉ. भामरे यांनी केली. या वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ. व्ही. जी. सोमानी, ड्रग कंट्रोलर यांना निर्देश देऊन सर्व कंपन्यांशी चर्चा केली. येत्या ३ ते ४ दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्याची माहिती खासदार Dr. Subhash Bhamre डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.