धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून नूतन प्राथमिक विद्यामंदिर धरणगाव शाळेला देवगिरी कल्याण आश्रम महिला समितीतर्फे ३२ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, मोजे देण्यात आले.
देवगिरी कल्याण आश्रम महिला समिती ही आदिवासी व पावरा विद्यार्थ्यांसाठी काम करते व या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी बालसंस्कार केंद्र देखील चालवते.
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे माजी विद्यार्थी तथा नगरसेवक कैलास माळी, प्रा.डॉ.संजय शिंगाणे यांच्या सौजन्याने व आर्थिक सहाय्याने विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही अनोखी भेट मिळाली. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार व नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश – बूट – मोजे यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.