धरणगाव प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून आज एकुण २५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. आढळून आलेल्या रूग्णांपैकी आठ रूग्ण धरणगाव शहरातील असून उर्वरित तालुक्यातील आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.
आज दुपारी धरणगाव प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार २५ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता धरणगाव तालुक्यात एकुण ९०५ रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.
आज आढळून आलेले रूग्ण कल्याणे खुर्द-३, कल्याणे होळ-२, बांभोरी बु-३, बोरगाव, बिलखेडा, जांभोरा, अंजनविहीरे, भोद बु, निंभोरा, पिंप्री येथे प्रत्येकी १ तर साकरे येथे २ आणि धरणगाव शहरातील गणाबप्पानगन २ तर विद्यूत नगर, मोठा माळीवाडा, अग्नीहोत्री गल्ली, पाताळेश्वर मंदीर, बालाजी गल्ली, भावे गल्ली येथे प्रत्येकी १ असे एकुण २५ रूग्ण आढळले आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत एकुण ३७ कोरोना बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ६२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २४४ रूग्णांवर उपचार सुरू आहे. अशी माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली.
dharangaon corona, jalgaon corona, corona news jalgaon, dharangaon covide center, borgaon, anjanvihire, pimpri, bambhori, vidyut nagar, ganabappa nagar] agnihori galli, kalyane hol