Home आरोग्य दिल्लीचे उपराज्यपाल यांच्या कार्यालयात १३ पॉझिटिव्ह

दिल्लीचे उपराज्यपाल यांच्या कार्यालयात १३ पॉझिटिव्ह

0
24

 

नवी दिल्ली, वृत्तसेवा | दिल्लीत उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. मंगळवार २ जून रोजी सकाळी ही माहिती समोर आली असून दिल्लीतील करोनाबाधितांची संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

दिल्लीत सोमवारी चार दिवसानंतर एक हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्या अगोदर २८ ते ३१ मे दरम्यान सलग हजार पेक्षा अधिक करोनाबाधित रुग्णांची दिल्लीत नोंद झाली होती. तर १ जून रोजी ९९० रुग्ण आढळले होते. दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या २० हजार ८३४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५२३ झाली आहे.


Protected Content

Play sound