धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने धरणगाव येथे हॉलिडे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन सादर केले. पश्चिम रेल्वेमार्फत मार्च ते जून या कालावधीत ०९१२९/०९१३० बांद्रा रिवा एक्सप्रेस, ०९०२५/०९०२६ बलसाड – दानापूर एक्सप्रेस आणि ०९५७५/०९५७६ राजकोट – महेबूबनगर एक्सप्रेस या ३६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांचा धरणगाव येथे थांबा निश्चित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, ताप्ती सेक्शनसाठी पुणे ट्रेन सुरु करावी या जुन्या मागणीसह ताप्ती गंगा एक्सप्रेस आणि अहमदाबाद – बरोनी एक्सप्रेस या गाड्यांचा धरणगावला थांबा मिळावा याबाबतही चर्चा झाली. यासंदर्भात आधी दिलेल्या मागण्यांवरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, सुनील चौधरी आणि किरण वाणी यांनी खासदार स्मिताताई वाघ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.