Home क्राईम धरणगाव हादरले : तरूणाच्या खुनामुळे प्रचंड खळबळ

धरणगाव हादरले : तरूणाच्या खुनामुळे प्रचंड खळबळ

0
190


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील धव्वी विहिर फाट्याजवळ आज सायंकाळी झालेल्या हल्ल्यात तरूणाचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील धव्वी विहिर फाट्याजवळच्या रस्त्यावर आज सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली असता रस्त्यावर एका कारजवळ तरूणाचा मृतदेह रक्ताचा थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या तरूणावर गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या वृत्तानुसार मयत तरूणाचे नाव गोपाल मालचे असून त्याच्यावर राहूल सावंत याने गोळ्या झाडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे गोपाल मालचेचा खून केल्यानंतर मारेकरी हा स्वत:हून धरणगाव पोलीस स्थानकात दाखल झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound