धरणगाव, अविनाश बाविस्कर | एकीकडे मंत्रालय विस्तारात आ. गुलाबराव पाटील यांना महत्वाचे खाते मिळण्याची अपेक्षा असतांना दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ जळगाव ग्रामीणमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून याबाबत आज त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी समर्थकांशी धरणगावात संवाद साधला.
येत्या काही दिवसांमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार अपेक्षित असून यात खान्देशची मुलूखमैदानी तोफ तथा माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांना महत्वाचे मंत्रीपद मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील भाऊ समर्थकांनी आता शिवसेनेच्या पदांचा राजीनामा देऊन खंबीरपणे आ. गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आ. गुलाबराव पाटील हे मुंबईत असले तरी स्थानिक पातळीवरील घडामोडींवर त्यांचे पुत्र प्रतापराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, ्राज धरणगाव येथे शिंदे समर्थक शिवसेना कार्यालयास माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. यावेळेस धरणगाव शहरातील विविध विषयांवर व पुढील रणनितीवर चर्चा करण्यात आली या वेळेस राजेंद्र महाजन, विलास महाजन, रवींद्र कंखरे, संजय चौधरी, भानुदास विसावे, अभिजित पाटील, भगवान महाजन, वाल्मिक पाटील, बुट्या पाटील, भैय्या महाजन, पापासेठ वाघरे, हिरालाल महाराज, विशाल महाजन, संतोष महाजन, प्रशांत देशमुख, नरेश कट्यारे, जगदीश मराठे, अविनाश महाजन, योगेश महाजन, शेखर महाजन, धाकला महाजन, अक्षय महाजन, राजू महाजन, किशोर पाटील, हर्षल महाजन, तसेच शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतापराव पाटील यांनी धरणगाव शहरातील सर्व घडामोडींवर थेट स्वत: लक्ष देण्यास प्रारंभ केल्याची बाब लक्षणीय मानली जात असून आगामी काळातील नगरपालिका निवडणुकांसह अन्य महत्वाच्या घडामोडी या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडतील असेही आता स्पष्ट झाले आहे.