धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ३६ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
धरणगाव शहरातील अमळनेर रोडवर असणार्या गायरानासाठी राखीव असलेल्या जमीनीवरील वादग्रस्त अतिक्रमण कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आले. दरम्यान, या प्रक्रियेमुळे शहरात कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून ते दिनांक ४ नोव्हेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत अर्थात ३६ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या संदर्भातील आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी पारीत केले आहेत. या आदेशातून रूग्णसेवा, पाणी पुरवठा, शहरातून जाणारी वाहतूक, शासकीय कर्मचारी, सार्वजनीक वितरण व्यवस्था आदींना वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.