मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मोटारसायकलींची चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

धरणगाव शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात त्यांनी दुचाकी चोरी करणारी एक टोळीच असल्याची माहिती दिली. चार संशयित आरोपींची ओळख पटून त्यांनी धुळ्यातून ७ दुचाकी काढून दिल्या आहेत. चोरट्यांकडून आणखी काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पोलिस नाईक उमेश पाटील, समाधान पाटील, विनोद संदानशिव, वैभव बाविस्कर यांनी केली. दरम्यान, चौकशी अद्याप सुरु असून संशयित आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्यामुळे त्यांची नावे पोलिसांनी उघड केलेली नाहीत.

Protected Content