धरणगाव प्रतिनिधी | राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य (आत्मा) अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती (एसएफएसी) करिता राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीवर राज्यातील २० प्रगतीशिल शेतकर्यांची निवड करण्यात आली. या राज्यस्तरीय समितीमध्ये जळगाव जिल्ह्यातून धरणगाव येथील राजेंद्र महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य (आत्मा) अंतर्गत राज्यस्तरीय सल्ला समिती (एसएफएसी) करिता राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीवर राज्यातील प्रगतीशिल शेतकर्यांची निवड करण्यात आली. या राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीमध्ये राज्यातील २० प्रगतीशील शेतकर्यांचा समावेश आहे. यात धरणगाव येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र किसन महाजन यांचा समावेश आहे. ते धरणगाव येथील शिवसेना शहर प्रमुख असून नगरपालिके स्वीकृत सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत. शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच त्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवण्यासाठी ही समिती प्रयत्न करते. ही समिती अतिशय महत्वाची मानली जाते.
या नियुक्तीबद्दल त्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते पप्पू भावे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, या राज्यस्तरीय समितीमध्ये पुढील प्रमाणे सदस्यांचा समावेश आहे.-राहुल रसाळ (जि. नगर), यज्ञेश वसंत सावे (पालघर), रेखा भास्कर दिसले (रायगड), बाजीराव बच्चाराम झेंडे (सिंधुदुर्ग), राजेंद्र किसन महाजन (जळगाव), नरेंद्र लोटण सोनवणे, सुगंधा मिलिंद भोये (दोघे नाशिक), सुचिता प्रशांत नानगुडे (पुणे), महेश राजेंद्र पाटील (सोलापूर), गणेश बजरंग बाबर (सातारा), अनिता संग्राम सावंत, अरुण शामराव सावंत (दोघे सांगली), अशोक मारुती फराकटे (कोल्हापूर), अभिमान अवचर (बीड), लालसाहेब देशमुख (लातूर), कांचनमाला संगवे (उस्मानाबाद), पंजाब डख (परभणी), वैशाली चव्हाण (नागपूर), मालती कुथे (चंद्रपूर), पुंडलिक देशमुख (गडचिरोली).