धनश्री पाटीलचा व्ही स्कूल चॅलेंज ॲपवर सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्रासह मेडल देऊन सन्मान

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयाची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी धनश्री संजय पाटील हिने वोपो वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, पुणे व्हि-स्कुल 21 डे चॅलेंज 2024 यात सहभाग घेतला होता. या उपक्रमात उस्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल धनश्री पाटील हिला प्रमाणपत्रासह मेडल मिळाले आहे.

वोपो या शैक्षणिक ॲप द्वारे विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन,पुणे विविध उपक्रम राबवत असते. यावर्षीच्या व्हि-स्कुल 21 डे चॅलेंज 2024 मध्ये धनश्री संजय पाटीलने सहभाग घेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल तिला पुणे येथून टपालाद्वारे प्रमाणपत्र व मेडल मिळाले आहे. यावेळी वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत, संचालिका ऋतुजा जेवेयांनी तिचे कौतुक केले आहे. दरम्यान सदर उपक्रमाबाबत धनश्री पाटीलला प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत कुमार पाटील, वर्गशिक्षिका स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाचे श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यु. एच. करोडपती, सचिव डॉक्टर सचिन बडगुजर, संचालक डॉ. चेतन करोडपती यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. धनश्री पाटील ही सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव आशा पाटील यांची कन्या आहे.

Protected Content