कृष्णा पाटील यांना जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे आणि खान्देश मराठा मंडळातर्फे जेष्ठ अहिराणी साहित्यिक व अ. भा. साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार प्राप्त कृष्णा पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिराणी बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनार्थ आयुष्यभर केलेल्या सेवेप्रति अमळनेरच्या जेष्ठ साहित्यीक कृष्णा पाटील यांना नाशिक येथील कालिका मंदिर ट्रस्ट च्या सभागृहात नुकताच आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. तसेच यंदाचे अहिराणी भाषा संवर्धक सारस्वत डॉ दामोदर बोरसे पुरस्कार एम के पवार , प्रा भगवान पाटील , लता पवार , समाधान सोनवणे , वनमाला पाटील , रोहित पवार याना प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यीक डॉ फुला बागुल , मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस , ऍड नितीन ठाकरे , उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे विकास पाटील , कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील , अर्जुन पाटील , डॉ एस के पाटील उपस्थित होते. प्रमोद कुवर यांनी सूत्रसंचालन व प्रकाश माळी यांनी आभार मानले. यावेळी महाकवी कालिदास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रिमझिम काव्य संमेलन घेण्यात आले. ४५ कवींनी आपल्या कविता सादर केल्यात. त्यात गो शि म्हस्कर , प्रा प्रकाश माळी , डॉ अरुण अहिरराव , लतिका चौधरी , वेदराज कपाटे याना सन्मानित करण्यात आले. कृष्णा पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , माजी आमदार दिलीप सोनवणे , मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील , मॉर्निंग कट्टा ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला.

Protected Content