मुंबई येथे लेवा साहित्य रत्न म्हणून धनंजय कोल्हे यांचा गौरव

डोंबिवली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे असोद्याचे साहित्यिक धनंजय भास्कर कोल्हे यांना ‘लेवा साहित्यिक रत्ने’ पुरस्कार माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.

 

आज रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी ‘लेवा साहित्यिक रत्ने’ या ग्रंथाचे प्रकाशन आनंद कल्याणकारी संस्था, डोंबिवली यांनी आयोजित केले होते.  या ग्रंथात समाजातील साहित्यिकांचा जीवन प्रवास मांडण्यात आला आहे.  तसेच यातील साहित्यिकांना माजी महसूलमंत्री तथा  आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते  तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्य स्तरावरील लेवा साहित्यिक रत्ने या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यात असोद्याचे साहित्यिक धनंजय भास्कर कोल्हे यांचाही समावेश आहे.  त्यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

धनंजय कोल्हे यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहे. त्यांनी तब्बल साडेसात किलो वजनाच्या आठशे  पानाच्या लेवा आयकॉन्स या ग्रंथाचे लेखन केले आहे. याशिवाय त्यांनी उजेड पेरणारा माणूस,  वाचनालय एक प्रेरणास्रोत,  कर्मयोग,  उज्ज्वल यशाचा मार्गदर्शक,  बाळासाहेब – एक आदर्श प्रज्ञावंत यांसारखी पुस्तकेही लिहिली आहेत.  तसेच ते आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांचे मानकरी देखील ठरले आहेत.

Protected Content