फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाला नॅककडून ‘अ’ श्रेणी प्राप्त झाल्याने आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, माजी आ.शिरीष चौधरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत आंनदोत्सव साजरा केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऐतिहासिक भूमीत साकारलेले तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय नॅकच्या तिसऱ्या निकालात 3.24 सीजीपीए मिळवून ‘अ’ श्रेणी प्राप्त केले आहे. हे उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रात अव्वल स्थान मिळवणारे पाहिले महाविद्यालय आहे. याचाच आनंद महाविद्यालयाच्या परिसरात आज फटाक्यांची आतषबाजी करत बँडच्या तालावर जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांच्या महाविद्यालयात आगमन होताच, त्यांना खांद्यावर उचलून प्रवेशगेटपासून ते कार्यालयापर्यंत आणण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या आग्रहस्त त्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. यांच्याबरोबर माजी आ. शिरीष चौधरी यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. याप्रसंगी प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी जल्लोष साजरा केला.