नगराध्यक्षकांच्या भोंगळ कारभारामुळे विकास कामे ठप्प ; विरोधकांचा आरोप

WhatsApp Image 2019 08 06 at 11.49.15 AM

यावल, प्रतिनिधी | येथील नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी यांच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारांमुळे शहरातील अनेक प्रलंबीत विकासकामे होत नसल्याने शहरातील व विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांमध्ये व विकास कामांना चालना देणारे नगरसेवक यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदन माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल वसंत पाटील, नगर परिषदचे उपनगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांच्यासह आदी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी यांनी मागील ५ महीन्यांपासुन एकही सर्वसाधारण सभा घेतलेली नाही. नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी नगर परिषदची सर्वसाधारण सभा ही ७ मार्च रोजी घेतलेली आहे. नगर परिषद अधिनियमानुसार नगराध्यक्षांनी दर दोन महीन्यांनी नगर परिषदची सर्व साधाण सभा घेणे बंधकारक आहे. असे असतांना मागील पाच महीऱ्यापासुन नगराध्यक्ष यांनी सभा घेतलेली नाही. त्याअनुसार मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षांनी मुदतीत सर्वसाधारण सभा बोलावली नाही असा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करायला पाहीजे होते. तरी मुख्याधिकारी यांनी तसा अहवाल त्वरीत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून नगराध्यक्ष हे आपल्या कर्तव्यात कसुर करीत आहे असे निर्देशनात आणुन देणे आवश्यक आहे. नगराध्यक्ष सौ. कोळी यांच्या या गंभीर बाबीमुळे नगर परिषदचा दुर्लक्षीत व भोंगळ कारभारांमुळे शहरातील अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसुन येत आहेत. यावल शहरातील प्रमुख मार्गावर विविध महत्वाच्या चौकात ठीकठीकाणी मोकाट गुरांचा मुक्त संचार वाढला असुन, गुरांच्या या गोंधळामुळे रहदारीस मोठे अडथळे निर्माण होवुन प्रसंगी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात नागरीक आणि नगरसेवक यांनी संबधीत विभागास सांगुन देखील या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही.शहरातील विस्तारीत भागातील अनेक रस्त्यांवर चिखल झालेला असुन त्या चिखलमय झालेल्या रस्त्यावरून वाहनधारक आणि पादचारी यांना चालणे अवघड झाले आहे. तात्काळ या रस्त्यांवर मुरुम किंवा खरता टाकण्याची आवश्यकता आहे. शहरातील हद्दवाढ झालेल्या भागातील विकास कामांचे प्रस्ताव नगरविकास विभाग, मंत्रालय मुबंई येथे पाठविणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत तसे प्रस्ताव देखील पाठविण्यात आलेले नाही. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही मुदतीत होत नसल्याने शहरातील विकासकामे ही पुर्णपणे ठप्प झालेली आहेत. यासर्व प्रकारामुळे नगर परिषदेमध्ये भोंगळ कारभार पहावयास मिळत आहे. मुख्याधिकारी यांनी वरील बांबींचा विचार करून त्वरीत सभेचे आयोजन करणेसाठी जिल्हाधिकारी यांना तात्काळ अहवाल पाठवावा अशी मागणीचे निवेदन नगरसेवक अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेविका रुख्माबाई नथ्थु भालेराव ,नौशाद मुबारक तडवी, पौर्णिमा फालक देवयानी गिरीष महाजन यांनी नगरपरिपदचे कार्यालयीन अधिकारी विजय बढे यांना दिले आहे.

Protected Content