यावल प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत डोणगाव येथे प्रवेशद्वाराच्या व रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे या दोन कामांचे भूमिपूजन होऊन विकासकामास प्रारंभ झाला आहे.
तालुक्यातील किनगाव डांभुर्णी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अरुणा पाटील यांच्या सहकार्याने व माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील यांच्या प्रयत्नातून १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत डोणगाव ग्रामपंचायत सरपंच आशाताई पाटील, उपसरपंच मनोहर भालेराव व सर्व ग्रामपंचायत सदस्य डोणगाव यांच्या पाठपुराव्याने गावात प्रवेशद्वाराच्या व रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे या दोन कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या अरूणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, डोणगाव येथे झालेल्या या विविध विकास कामांच्या भूमीपुजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील ,जि.प.सदस्या अरूणामाई रामदास पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य उमाकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, किनगाव बुद्रूकचे संजय पाटील खुर्दचे सरपंच भुषण पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष अॅड.देवकांत पाटील, उंटावद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत पाटील, संजय गांधी निराधार समितीचे जेष्ठ सदस्य दिनकर पाटील, साहेबराव पाटील, स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णीचे संचालक संदीप पाटील, ग्रा.प.सदस्य शुभम विसवे, राज टेलर, प्रशांत पाटील, संजय वराडे व डोणगाव ग्रा.प.चे सर्व सदस्यांसह गावातील जेष्ठ नागरीक, महीला बचत गट, शिवराजे मित्र मंडळ, छत्रपती शासन गृप, गुरु मित्र मंडळ, सम्राट गृप व रॉयल फौजी योगेश पाटील मित्रपरीवार ग्रामस्त आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना प.स.सदस्य उमाकांत पाटील यांनी सांगीतले की, “जळगाव जिल्हा परिषदमधील सर्वात जास्त विकास कामे ही किनगाव डांभुर्णीच्या जिल्हा परिषद गटात आर.जी.पाटील यांच्या प्रयत्नांनी होत असून यापुढेही सर्वसामान्यांच्या विकासासाठी त्यांनी अशीच कामे करावी. त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत असून त्यांच्या कामास शुभेच्छा आहेत”
“डोणगाव येथील विकास कामांसोबतच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरालाही लवकरच संरक्षण भिंत तसेच मंदिराच्या खिडक्यांना दरवाजे बसवीले जातील” असे माजी जि.प.सदस्य आर.जी.पाटील यांनी यावेळी सांगीतले. तर अध्यक्षीय भाषणात माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी “आर.जी.पाटील यांच्या विकास कामांचा अनुभवाचा फायदा किनगाव डांभुर्णी जि.प.गटाला होत असून सर्वात जास्त कामे ते आपल्या गटात खेचून आणतात” असं सांगत पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप पाटील यांनी केले तर कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.प.सदस्यांनी प्रयत्न केले.