जुहू येथील देव आंनद यांचा ७३ वर्षीय जुना बंगल्याची विक्री !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवगंत अभिनेते देव आनंद हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी एक से बढकर एक असे अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.  आजही त्यांचे जगभरात लाखो चाहते होते. स्वर्गीय देव आनंद यांचा जुहूतील बंगला एका रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आला आहे. आता हा बंगला लवकरच तोडला जाणार असून, त्या जागी मोठी इमारत बांधण्यात येणार आहे.

स्वगीय अभिनेते देव आनंद यांनी १९५० मध्ये जुहूमध्ये हा बंगला बांधला होता. त्यावेळी इथे फारशी गर्दी नव्हती. २०११ साली जेव्हा देव आनंद यांचं निधन झाले तेव्हापासून हे घर रिकामं आहे. एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार देव आनंद यांचा मुलगा सुनील अमेरिकेत स्थायिक झाला आहे; तर त्यांच्या पत्नी कल्पना मुलगी देवीनाबरोबर उटी येथे राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार- देव आनंद यांचा हा बंगला एका रिअल इस्टेट कंपनीला ४०० कोटींना विकण्यात आला आहे. हा बंगला ज्या भागात आहे, त्याच भागात अनेक कलाकारांचे बंगले आहेत. देव आनंद यांचा बंगला तोडून, त्या जागी २२ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. देव आनंद पत्नी आणि मुलांबरोबर ४० वर्षे या बंगल्यात राहत होते. देव आनंद यांच्या निधनानंतर या बंगल्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हतं. त्यामुळेच हा बंगला विकला गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, देव आनंद यांच्या कुटुंबीयांनी पनवेलमधील काही जागाही विकल्याचे देखील समोर आलं आहे.

Protected Content