श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगांवच्या  संत श्री गजानन महाराजांची आज ११३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्याने मोठ्या संख्येने भाविक शेगांव येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगांव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो

सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषता ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्यासुद्धा सहभागी झाल्या आहेत. शेगावात शेकडोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्व ,रथ, मेनादिंडी आदि वैभवासह सपूर्ण गावात नगर परिक्रमा करणार आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात हरी नामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभरातील उत्सवापैकी हा देखील एक मोठा उत्सव असतो.

श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव निमित्त दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची नगर परिक्रमा पालखी निघणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने पता की धारी दिंड्या देखील सहभाग होत असतो. उत्सवानिमित्त श्रींचे मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन व काही अप्रिय घटना घडू नये याची दक्षता म्हणून मंदिरात येणे व जाण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे त्यात स्त्रीचे समाधी दर्शन व्यवस्था श्रीमुख दर्शन व्यवस्था श्री महाप्रसाद श्री महापारायण कक्ष मंडप, इत्यादी व्यवस्था केली गेली आहे श्री संस्थांचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्त यांचे देखरेख व मार्गदर्शन मध्ये समस्त सेवाधारी आलेल्या भक्तांना सर्वतोपरी सुविधा पुरवत आहेत.

भक्तांची दिवसान दिवस वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार श्री मंदिर परिसराचे पश्चिम भागावर श्री संस्थान द्वारा बारा मीटर रुंदीचा नवीन भव्य रस्ता विकसित करण्यात आला आहे. या रस्त्याने यापुढे सर्व उत्सव व विशेष प्रसंगी आणि वर्षभरात मंदिरामध्ये येणाऱ्या शेकडो दींड्या पालख्या तसेच शहरातील विविध शोभायात्रा व सर्व धर्मीय मंडळाचे मिरवणूक भाविक भक्तांची सुरक्षा व सुव्यवस्था लक्षात घेऊन.

प्रसंगी कोणतीही अनुचित व अप्रिय घटना घडू नये म्हणून .गर्दीचे नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाचे विविध मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार खबरदारीचे उपायोजना म्हणून लहुजी वस्ताद चौक मधून नव्याने केलेल्या या बारा मीटर रस्त्यावरील श्री मंदिर परिसराचे पश्चिम दारातून आत येथील व सर्व देवी देवतांचे संत महंतांचे, ब्रह्मरुंद द्वारा पूजन करून संबंधितांचा  सत्कार तसेच सहभागी भाविकांना चहापान व इत्यादी सोपस्कार पार पडून. या दिंड्या पालख्या शोभायात्रा व मिरवणुकी श्री मंदिर परिसराच्या दक्षिण द्वारातून पुढे मार्गस्थ होतील  यासाठी श्री संस्थांच्या नियोजनात सर्वांनी सहकार्य करून. सहयोग प्रदान करावा असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानचे सेवाधारी विश्वस्त मंडळी व समस्त सेवादारी यांनी केले आहे. मुख्य म्हणजे आज विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर उद्या २१ सप्टेंबर गुरुवार रोजी हरिभक्त परायण श्रीधर बुवा आवारे यांचे सकाळी सहा ते सात काल्याचे किर्तन व नंतर दहीहंडी गोपाल काला होईल व या उत्सवाची समारोप होईल.

Protected Content