बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या अटकेत

bhusaval 2

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जुनी नगरपालिका बाजूला हॉटेल पंचाली समोर रोडवर बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या एकाला आज (दि.११) सकाळी १०:३० येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सईद शेख अमीर शेख (वय-28 रा. पापानगर, भुसावळ) असे आरोपीचे नाव असून शहरातील जुनी नगरपालिका बाजूला हॉटेल पंचाली समोर रोडवरील सार्वजनिक जागी गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत आरोपीस ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला १५ हजार रुपयांचा गावठी कट्टा आढळून आल्याने त्यावर भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग 6 गु.र.न 573/2019 आर्म अँक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असुन या गुन्हयाचा तपास पो.ना रविंद्र बिऱ्हाडे करीत आहे

यांनी रचला सापळा
पो.अधिक्षक पंजाबराव उगले जळगाव, अप्परयतन.पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके जळगाव, उप.पो.अधिकारी गजानन राठोड भुसावळ, पो.निरीक्षक दिलीप भागवत भु.बा.पेठ.पो.स्टे भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली भु.बा.पेठ पो.स्टेचे पो.हे.का युवराज नागरुत, पो.ना. रवींद्र बिऱ्हाडे, किशोर महाजन, यासिन पिंजारी, पो.का विकास सातदिवे, ईस्वर भालेराव, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी आणि अक्षय चव्हाण यांनी सापळा रचत आरोपीस अटक केली आहे.

Protected Content