….आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठेकेदाराला सुनावले खडे बोल

पुणे प्रतिनिधी । आपल्या स्पष्टवक्तेपणाबाबत ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सकाळी  पोलीस मुख्यालयातील बांधकामाबाबत ठेकेदाराला खडे बोल सुनावत आयुक्तांनाही समज दिली.

 

अजित पवार यांनी आज सकाळी   पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले. गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. ”माझ्या भाषेत बोलायचं तर छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय ?” असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.