वंचितचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन यांचा एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

मुक्ताईनगर प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुसूदन सपकाळ, जिल्हा उपाध्यक्ष अमोल इंगळे, राजेंद्र भाकरे, नारायण कुयटे आणि त्यांच्या शंभर कार्यकर्त्यांनी आज मुक्ताईनगर येथे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले, मी तुम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो.  गेल्या वेळी बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विकासाचे राजकारण केले. माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा कधी पक्ष विचारला नाही हे पुर्ण बुलडाणा जिल्हयाने अनुभवले. माझ्याकडे असणाऱ्या विविध खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला त्यातुन विविध विकास कामे पार पडली, मलकापूर नांदुरा व इतर नगरपालिकासाठी  कोट्यवधी रुपयांचा निधी आणून रस्ते व इतर विकास कामे मार्गी लावली. संपूर्ण जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करून तत्काळ दुष्काळी मदत मिळवून दिली. 

शेगाव व सिंदखेड राजा विकास आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी निधी मिळवून दिला. जिगाव, खडकपूर्णा या प्रकल्पांच्या प्रलंबित असलेल्या पुनर्वसन आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकांचे आयोजन करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. कृषी मंत्री असताना तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले होते त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती मधील नविन तंत्रज्ञान अवगत होणार होते जिल्हयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार होती. परंतु काही अडचणीमुळे ते काम थंडबसत्यात पडले ते पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भविष्यात सुध्दा बुलडाणा जिल्हयातील विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. आजपासून आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले असुन आगामी काळात पक्ष विस्तार करून पक्षाची ध्येय धोरणे, विकास कामे सामान्य जनते पर्यंत पोहचवयाचे असून निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळवून द्यायचा आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. 

यांनी केला पक्षात प्रवेश 

यावेळी निलेश टोंगळे, सोपान सपकाळ शंकर उबाळे, संतोष पाटील, ओंकार वराडे, तुकाराम उबाळे, शुभम बोरसे, लक्ष्मण पवार, योगेश सांगळे, अंकुश लहासे, संतोष गोरे, विशाल घोडेस्वार, नारायण नाईक, सुरेन्द्र नाईक, गणेश थिगळे, विनोद साबळे, संजय भालेकर, पंकज बस्सी, कैलास बस्सी, किशोर पडवाळ, नरेश बस्सी, नरेंद्र बस्सी, दीपक भोकन, कृष्णा चोपडे, शेखर पाटील, भुषण वानखडे, पृथ्वी राजपूत, विश्वपाल परमार, कैलास जाधव, जयसिंग जाधव, अनंता सोनागे, तुळशीराम उबाळे, संजय गिराळ, रमेश शिवणेकर, बाबुराव वाकोडे, प्रमोद तोमर, रामरतन उकार्डे, दशरथ जाधव, प्रथमेश शिराळ, ईसाकभाई मुनाफ पटेल, शे.अफसर शे. रज्जाक उर्फ राजु मेंबर, शे. सादिक शे. करामत, साजिद वहाब पटेल, वसंत जगताप याप्रमुख कार्यकर्त्यांसह शंभर जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यांची होती प्रमुख्याने उपस्थिती

याप्रसंगी  बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, शहादा माजी आमदार उदेसिंग पाडवी, डॉ तुषार सनांसे, माधव पाटील, विलास धायडे, अनिल वराडे, निलेश पाटील, शिवराज पाटील, बापू ठेलारी, राहुल पाटील, अभय देशमुख, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

 

 

 

 

 

Protected Content