भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी महाजनांसह चंद्रकांतदादा आणि पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा

collagemahajan munde

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची भाजप प्रदेशाध्यपदासाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रामुख्याने आघाडीवर आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महिनाभरात नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. सोबतच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आशिष शेलार यांच्याही नावाचा ऐनवेळी विचार केला जाऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुका पाहता प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय अध्यक्ष निवडीपाठोपाठ नूतन प्रदेशाध्यक्षची निवड अपेक्षित आहे.

Add Comment

Protected Content