रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बदलापुर घटनेच्या निषेधार्थ रावेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतर्फे आज काळ्या फिती लावून निदर्शने केले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.रावेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन झाले.
महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्याचा सन्मान करत महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ याकडे सरकारचे लक्ष वेधले पाहिजे म्हणून निषेध म्हणून तोंडावर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. विविध घोषणाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
यावेळी एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ . राजेंद्र पाटील, सोपान पाटील, हरिष गणवाणी, उबाठा शिवसेनेचे प्रल्हाद महाजन, योगिराज पाटील, रविंद्र पवार, अविनाश पाटील, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, रमेश महाजन, योगेश पाटील, सुनील कोंडे, अँड. योगेश गजरे, राजु सवर्णे, अय्युब खा पठाण अशोक शिंदे महेमूद शेख, संतोष पाटील, सावन मेढे, भुपेंद जाधव, धुमा तायडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.