लोकशाही दिनाचे 9 ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव प्रतिनिधी । नाशिक विभागाचा विभागीय लोकशाही दिन दि.९ ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वाजता विभागातील दहा विभागप्रमुख यांचे उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

दरम्यान, शासनाकडील 2 ऑगस्टच्या आदेशान्वये नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे निर्बध लागु असुन इतर जिल्ह्यात निर्बध शिथील करण्यात आले आहे. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 2 ऑगस्ट, 2021 च्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात निर्बध/सुचना निर्गमित करण्यात आलेल्याचेही श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

Protected Content