जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली गावातील एका धार्मीक स्थळावर अज्ञातांनी आक्षेपार्ह लिखाण करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला आहे. पोलीसांनी त्वरीत कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणीचे निवेदन भादली येथील ग्रामस्थांनी गुरूवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजता पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन देवून केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली गावातील एका धार्मिक स्थळावर काही अज्ञात तरुणांनी आक्षेपार्ह लिखाण लिहून धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल भादली ग्रामस्थांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात जावून कारवाईची मागणी केली. परंतू पोलिसांनी आवश्यक ती कारवाई न केली नाही. त्यामुळे भादली येथील ग्रामस्थ यांनी गुरुवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजता सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख यांच्यासह भादली गावातील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी ग्रमस्थांनी त्यांना वस्तुस्थितीजन्य पुरावा व सीसीटीव्ही कॅमेराचे पेन ड्राईव्ह देऊन गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन दिले आहे.
याप्रसंगी अब्दुल रहमान पटेल, आरिफ फकीरा मन्यार, रफिक सलीम पटेल, जावीद पिंजारी, गुलाम शब्बीर पटेल, जाकीर दाऊद पटेल, आलिम पटेल, शरीफ पिंजारी, फिरोज पिंजारी, सिद्दीक पटेल, शफिक पटेल, असलम पटेल, एजाज पटेल, इरफान पिंजारी व सलीम पटेल आदींची उपस्थिती होती.