डॉ. पायल तडवी प्रकरणातील दोषींवर जलद कार्यवाही करा

bhusawal nivedan

भुसावळ प्रतिनिधी । डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर जलद गतीने खटला चालवून कठोर कार्यवाही करण्याची मागणी येथे करण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी निवेदन सादर करण्यात आले आहे. यात नमूद केले आहे की,
डॉ. पायल तडवी यांना सिनियर डॉ. हेमा आहुजा, अंकिता खंडेलवाल व भक्ती मेहरे या रॅगिंग करत होत्या. तिचा ज्युनियर्स समोर अपमान करत होत्या. डॉ. पायल आदिवासी असल्यामुळे तिला प्रवेश मिळाला व तिच्याकडे गुणवत्ता नाही असे टोमणे तिला सतत या डॉक्टर्स देत होत्या. या विरुध्द तिने लेखी तक्रार हॉस्पिटलकडे केली होती. परंतू हॉस्पिटलने तिला संरक्षण दिले नाही व तिला त्रास देणार्‍यांवर कारवाई केली नाही. या सर्व घटनांमुळे कोंडीत सापडलेल्या डॉ. पायलने हतबल होऊन जीवनाचा अंत करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. हा अन्याय व भयंकर आघात आहेच शिवाय दुर्बल घटकातील आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवरही अन्याय, व दहशत निर्माण करणारी ही घटना आहे.

या आहेत मागण्या

या प्रकरणात गुन्हेगारांवर रॅगिंग व अ‍ॅट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हे दाखल झाले असले तरी पुढील कारवाई झाली नाही . राज्यभरातून ह्या घटनेचा तीव्र निषेध होत आहे व मोर्चे आंदोलने होत आहेत. या अनुषंगाने डॉ.पायलच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या तिन्ही डॉक्टरांना बडतर्फ करून त्यांना अटक करा. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने त्या गुन्हेगार डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करा. तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या नायर हॉस्पिटल कॉलेज प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यांना निलंबित करा. अ‍ॅॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार डॉ.पायल च्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत करा. संबंधीत खटला त्वरित सुरु करून ऍट्रॉसिटी अंतर्गत स्पेशल कोर्टात जलद गतीने चालवून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा. शिक्षण संस्थांमध्ये दलित व आदिवासींवर होत असणार्‍या भेदभाव , जातीयवाद , जातीय रॅगिंग इत्यादींचा प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र म रोहित वेमुला कायदा अंमलात आणण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

यांच्या आहेत स्वाक्षर्‍या

या निवेदनावर विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष, बाळा पवार युवा जिल्हाध्यक्ष, दिनेश इखारे जिल्हा महासचिव , संजय सुरडकर जिल्हा सचिव,सुदाम सोनवणे, विद्यासागर खरात युवा जिल्हा सचिव, रुपेश साळुंके भुसावळ तालुकाध्यक्ष, सुनिल ठाकुर भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख, गणेश इंगळे भुसावळ शहराध्यक्ष, निलेश जाधव भुसावळ युवा शहराध्यक्ष, जयराज आव्हाड, भुषण आव्हाड, सोनु वाघमारे, विजय सोनवणे , लक्ष्मण सरदार व किरण वानखेडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Add Comment

Protected Content