भुसावळात मोबाईल दुकान फोडणारा एलसीबीच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सुरभी कॉम्पलेक्स व मोबाईलचे दुकान फोडून मोबाईलचे पॉवर बँक लांबविणाऱ्या गुन्हेगारास एलसीबीच्या पथकाने पकडले असून पुढील कारवाईसाठी भुसावळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शेख मोहसीन (बिल्लू) शेख मुन्ना रा. आगाखान वाडा, भुसावळ असे या गुन्हेगाराचे नाव आहे. भुसावळात घरफोडी व चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भुसावळमधील सुरभी कॉम्पलेक्समधील न्यू. श्रीराम होलसेल स्टोअर्सचे गोडावून व स्टार मोबाईलचे दुकान फोडीत त्याठिकाणाहून मोबाईलचे पॉवरबँक लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुकाने फोडणार चोरटा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली शरिफोद्दीन कमरोद्दीन काझी, युनूस शेख रसुल, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, दीपक चौधरी यांचे पथक तयार केले. या पथकाने सराईत गुन्हेगार शेख मोहसीन (बिल्लू) शेख मुन्ना याला ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता त्याने चोरी केलेले पॉवरबँक मुक्ताईनगर येथील त्याचा मित्र इम्मू याच्याकडे ठेवल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २३ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Protected Content