भ्रष्टाचार प्रकरण : पुन्हा सहा संशयित आरोपी ताब्यात

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समिती शौचालयाच्या भ्रष्टाचार प्रकरणात नव्याने सहा जणांना संशयित म्हणून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत २४ संशयितांची संख्या झाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर पंचायत समितीच्या शौचालय भ्रष्टाचार प्रकरण जिल्हाभरात गाजले आहे. या लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी अटकसत्र सुरू केले होते. याप्रकरणात १८ आरोपी पोलीसांच्या ताब्यात असतांना नव्याने तालुक्यातील कुसुंबा लुमखेडा आणि उदळी गावातून नव्याने सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता संशयित आरोपींची संख्या २४ वर पोहचली आहे. शौचालय भ्रष्टाचार प्रकरण आता मंत्रालयातील अधिवेशनात पोहचला आहे.

 

या सहा जणांना घेतले ताब्यात

कामिल जमील खान (वय 35) लुमखेडा, शेख आरीफ शेख रईस (वय 29) उदळी, फिरोज जमील खान (वय 40) लूमखेडा, आदम जहानखा तडवी (वय 37) कुसुंबा खु, रमेश सुभान तडवी (वय 40)  कुसुंबा, खु आरबाज फिरोज खान (वय २१) लुमखेडा अश्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे.  आज सायंकाळी उशीरापर्यंत चौकशी करून अटक करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी सांगितले आहे.

Protected Content