बुलडाणा, प्रतिनिधी | वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना अटक करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन पत्रकारांच्या वतीने आज (दि.२) खामगाव उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
खामगाव येथील अग्रवाल फटाका केंद्र अवैध आहे, त्यामुळे तहसीलदार खामगाव यांचे पथक पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्रवाल फटाका केंद्र सील करण्याची कारवाई करण्यासाठी काल गेले होते. या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकार शिवाजी भोसले हे गेले असता त्यांना सुनील अग्रवाल, संगीत अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत भोसले यांचा मोबाईल फोडला होता.
याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी बुलडाणा जिल्हा टी.व्ही. जर्नालिस्ट असोसिएशन खामगाव प्रेस क्लब खामगाव यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बुलडाणा जिल्हा टी.व्ही. जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले सचिव अनिल खोडके, नाना हिवराळे, मोहन हिवाळे, कुणाल देशपांडे, निखिल शाह, आंनद गायगोड, विनोद भोकरे, सुनील गुळवे, शरद देशमुख, बळीराम वानखडे, नितेश मानकर, सिद्धांत उंबरकार, किशोर होगे, गणेश पानझाडे, नंदकिशोर देशमुख, योगेश हजारे, धनंजय वाजपे, अनुप गवळी, अशोक जसवानी, मुबारक खान, सुरज देशमुख, गणेश पिंपळकार, आदी पत्रकार उपस्थित होते.