महाराष्ट्रातील इको फ्रेंडली गणेश मूर्तीची अमेरिकेत वाढली मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ येत आहे. प्रत्येक जण वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतो. हा सण जसा महाराष्ट्रात जसा उत्साहाने साजरा केला जातो तसाच तो आता परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, जपान सारख्या देशात मराठी माणसं मोठ्या संख्येने राहातात. कामा निमित्ताने अनेक जण तिथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तेही आपली परंपरा तिथे जपता. सर्वच मराठमोळे सण ते तिथे साजरे करतात. त्या पैकीच एक म्हणजे गणेशोत्सव. अशातच ठाण्यातील अनेक विक्रेते स्वतःच्या हाताने तयार केलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती अमेरिका,जपान तसेच कॅनडा येथे पाठवतात. या मूर्ती नाजूक असल्याने पाठवण्याची एक विशिष्ट पद्धत असल्याची माहिती विक्रेते देत आहेत.

यावर्षी अमेरिकेला 3 हजार मूर्ती गेल्या आहेत. तर कॅनडाला 2 हजार मूर्ती पाठवण्यात आल्यात. जपान येथे ही 500 मुर्त्या जाणार आहेत. अमेरिकेला कागदी लगद्यापासून बनवलेली 5 फुटाची मूर्ती पाठवण्यात आली आहे. या मूर्तीचे रूप लालबाग राजासारखे आहे. तर चार ते साडेचार फुटाच्या 25 मुर्त्या अमेरिकेला पाठवल्या आहेतं. प्रसाद वडके हे ठाण्यातील पातलीपाडा येथे राहतात. जवळपास गेल्या नऊ वर्षापासून ते विविध देशात आपल्या गणपतीच्या मुर्त्या एक्स्पोर्ट करतात. कोविड नंतर त्यांनी या व्यवसायाला अधिक चालना मिळाल्याचे सांगितले. सगळ्यात मोठी असलेली पाच फुटी मूर्ती त्यांनी 60,000 रुपयाला अमेरिकेला पाठवली आहे. ही मूर्ती त्यांनी बोटीने पाठवली असून गुजरात पोर्ट वरून या मुर्त्या ट्रान्सपोर्ट केल्या जातात. नेदरलँडला पाठवलेली मूर्ती जेएनपीटी पोर्ट वरून पाठवण्यात येते असे त्यांनी सांगितले. गेल्या नऊ वर्षात साधारण दीड ते दोन हजार रुपयांनी या मूर्तींचे भाव वाढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी आणि वर्षा येथील निवासस्थानी प्रसाद वडके यांनी बनवलेलीच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.

आता ऑर्डर वाढली असून एक्सपोर्टला जाणाऱ्या मूर्ती इको फ्रेंडली आहेत. या मुर्त्या बोटीने जातात. या मूर्ती शाडू आणि कागदापासून बनवलेल्या असल्याने नाजूक असतात. त्यामुळे एक्सपोर्ट करताना बबल रॅपिंग,बॉक्स यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करावी लागते. या मूर्ती अमेरिकेत पोहचण्यासाठी अडीच ते तीन महिने लागतात. अमेरिकेत मूर्ती हवी असेल तर त्याची बुकिंग जानेवारी- फेब्रुवारी पासून घेतली जाते अशी माहिती विक्रेते देत आहेत.

Protected Content