तालुका काँग्रेसच्यावतीने ग्रामीण भागात १०० डोसची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसच्यावतीने आज कुंसुंबा, चिंचोली, धानवड, रायपुर, उमाळा, कंडारी गावांसाठी किमान दररोज १०० डोस (लस) मिळावी, यासाठी वैद्यकीय तालुका अध्यक्ष डाँ. संजय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज चौधरी ,प्रमोद घुगे, भिकन सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही १०० डोस देण्याचा प्रयत्न करु हा शब्द डॉ. संजय चव्हाण यांच्यावतीने देण्यात आला आहे.

Protected Content