दिल्लीच्या पथकाकडून उद्या केळी पिकांवर पडलेल्या रोगाची पाहणी

pune 1

 

रावेर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर रोगांचा नायनाट करण्यासाठी आज पुण्यात ना. हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यासाठी दिल्ली येथील भारतीय अनुसंधान परिषदेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ यांचे पथक बोलावण्यात आले आहे. सदरील पथक यावल आणि रावेर तालुक्यातील केळीच्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर यावल तालुक्याची ओळख म्हणून केळी प्रसिद्ध आहे. भारतातच नव्हे तर जगभर केळी निर्यात केली जाते. पण अलिकडच्या काळात विषम हवामानाचा फटका जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बसला होता. तर काही वर्षापुर्वी ब्लॅक सिगाटोका रोगाने जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला होता. तेव्हा आ.जावळे यांनी पुढाकार घेउन निधी मिळवून दिला होता. तर आता रावेर यावल तालुक्यातील काही भागातील केळी वरती सीएमव्ही विषाणूची लागण झालेली दिसुन आली आहे.
याच्याच विचार करत ना. जावळे यांनी ‘सेव्ह बनाना’ ही चळवळी सुरु केली.

या चळवळीच पहिल पाऊल म्हणून रावेर यावल तालुक्यातील भागात केळीवर आलेल्या सीएमव्ही(हरण्या) रोगाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील भारतीय अनुसंधान परिषद दिल्लीच पथक आज तालुक्यात येत आहे. तालूक्यातील केळीवर अचानक आलेल्या सीएमव्ही (हरण्या) रोगावर उपाय योजनेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना.जावळे यांनी पुणे येथे तातडीची बैठक घेतली. या बैठकीत केळीवर अचानक आलेल्या रोगासंदर्भात आणि त्यावरील उपाय योजनांने संदर्भात चर्चा झाली. यावेळी दिल्ली येथील भारतीय अनुसंधान परिषद दिल्लीचे शास्त्रज्ञ यांना रावेर यावल तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी सीएमव्ही (हरण्या) रोग आला आहे.

 

त्या ठिकाणी भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सुचनेनुसार उद्या (दि.२१) रोजी पथक तालुक्यात दाखल होत आहे. या पथकात दिल्ली येथील डॉ.ऱाजवर्मा, डॉ.त्रिपाठी, डॉ.बडगुजर, डॉ.तिरमाली, व्हि.एस.सुपे यांच्यासोबत जळगाव येथील डॉ.शेख येणार आहेत. पुणे येथील झालेल्या बैठकीत महासंचालक डॉ.माने, अध्यक्ष सेवा प्रवेश मंडळ डॉ.विजय मेहता, संचालक विस्तार शिक्षण विट्ठल शिर्के, ICARR चे डायरेक्टर डॉ.शर्मा, डॉ.सुपे, डॉ.हितेंद्र सिंग, पोकळे उपस्थित होते.

Protected Content