पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेची इंस्टाग्रामवर अज्ञात खातेधारकाने फोटो व आक्षेपार्ह मजकूर टाकून तिची व परिवाराची बदनामी केल्याची धक्कादायक समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात इंस्टाग्रामवरील अज्ञात खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात ३८ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान इंस्टाग्रामवरील एका खातेधारकाने पिडीत महिलेचे फोटो व आक्षेपार्ह मजकूर टाकून तिची व तिच्या परिवाराची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही प्रकार पिडीत मुलीच्या लक्षात आल्यानंतर तीने थेट जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता इंस्टाग्रामवरील अज्ञात खातेधारकाविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.