बेजबाबदार व कर्तव्यात कसूर करणारा पोलीस नाईक निलंबित

1

जळगाव प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर कॉलेजात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीटी मशीन स्ट्राँग रूम वर तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. अचानकपणे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तपासणी केली असता एक पोलीस कर्मचारी कर्तव्यकसून करत असल्याचे चौकशी दरम्यान आढळून आले. कर्तव्यात अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार पणाचे वर्तन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील एस.एम. महाविद्यालयात ठेवलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपीटी मशीन स्टाँग रूम गार्ड रूम नंबर 1 वर जळगाव पोलीस मुख्यालयातील गार्ड अंमलदारसह तीन पोलीसांची नेमणूक 8 एप्रिल पासून करण्यात आलेली होती. 16 एप्रिल रोजी निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार यांनी मुक्ताईनगर येथील स्ट्राँग रूमला भेट देवून तपासणी केली असता गार्ड अंमलदार पोहेकॉ आंबेकर व पोलीस नाईक भोर हे उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक यांनी रजिष्ट्रार चेक केले असता त्यांना तफावत दिसून आले. पोलीस शिपाई नागसेन नामदेव इंगळे यांनी 16 व 17 एप्रिल रोजीच्या तारखेत कर्तव्यावर हजर राहण्यापुर्वीच रजिष्ट्रारवर सह्या केल्याचे आढळून आले. त्यानुसार निवडणूक निरीक्षक यांनी

नागसेन नामदेव इंगळे यांनी महत्वाचे कर्तव्यावर आगाऊपणे स्वाक्षऱ्‍या करुन आपले कायदेशिर कर्तव्यात अत्यंत बेशिस्त, बेजबाबदारपणाचे वर्तन आणि गैरशिस्त वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी बेजबाबदार आणि कर्तव्य कसून काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशा सुचना पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिल्या आहेत.

Add Comment

Protected Content