दीपाली सय्यद शिंदे गटाच्या मार्गावर : लवकरच निर्णयाची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटाच्या मार्गावर असून त्या याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात.

सुषमा अंधारे यांनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना थेट दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. यानंतर त्या वेळोवेळी पक्षाची बाजू जोरदारपणे लाऊन धरत असल्याचे दिसून येत आहे. नेमके हेच काम आधी दीपाली सय्यद यांनी केले. त्यांना देखील पडत्या काळात उध्दव ठाकरे यांची पाठराखण केलीय. नंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचे प्रयत्न देखील त्यांनी केले. मात्र आता सुषमा अंधारे यांच्यामुळे त्या अस्वस्थ असल्याचे मानले जात आहे.

या पार्श्‍वभूमिवर, एबीपी-माझा या वाहिनीशी बोलतांना त्यांनी वेगळी वाट निवडण्याचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या की, मी महाराष्ट्रभर काम केली आहेत. सुषमा अंधारे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना प्रूव्ह करायचंय की, माझं एक अस्तित्व आहे. मला आता शिवसेनेत साडेतीन वर्ष झाली आहेत. शिवसेनेत काम करते, त्यामुळे गरजेचं नाही की, स्क्रिनवर प्रत्येक वेळी येऊन टीका टिपणी करावी आणि टीका-टीप्पणी केल्यावरच तुम्ही राजकारणात सक्रिय असता, असं म्हणणं चुकीचं आहे. तसेच आगामी वाटचालीसाठी आपली वेट अँड वॉच ही भूमिका असल्याचेही त्या म्हणाल्या. यामुळे त्या अस्वस्थ असल्याने शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता बळावली असून याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो.

 

Protected Content