इकरा कोविड सेंटर येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते बेडसह एक्सरे मशीनचे लोकार्पण

जळगाव, प्रतिनिधी । येथील इकरा कोविड सेंटर, शिरसोली रोड येथे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नवीन ५० बेड व पोर्टेबल X-Ray मशीनचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

नवीन ५० बेड व पोर्टेबल X-Ray मशीनच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राउत , उपजिल्हाधिकारी श्री. महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. तसेच इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, सचिव हाजी अब्दुल गफ्फार मलिक, इकबाल शाह सर, अमीनभाई बादलीवाला, अल्फैज फाऊडेशनचे अध्यक्ष अब्दुल अजीज सालार, इकरा युनानी मेडिकल कॉलेज चे उपप्राचार्य डॉ.शोएब शेख, सेंटर इन्चार्ज डॉ.ठाकूर, डॉ.जैन, कॅम्पस इन्चार्ज अफजल शेख, ॲड.शरीफ शेख हे देखील उपस्थित होते.

Protected Content